Kokan: कळसुलीत बिबट्याचा मुक्त संचार; हल्ल्यात गाईचे एक वर्षाचे वासरू जखमी

0
78
बिबट्याच्या-हल्ल्यात-वासरू-जखमी.

प्रतिनिधी – राहुल वर्दे

कणकवली: कळसुलीत बिबट्याचा मुक्त संचार बिबट्याने घरासमोर दावणीला बांधलेल्या एक वर्षाच्या गायीच्या वासरावर हल्ला. बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी झाले आहे ही घटना कणकवली तालुक्यातील कळसुली मधलीवाडी येथे घडली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-काजू-पीक-फळ-योजनेत-देणार-100/

कळसुली मधलीवाडी येथील बबन विठोबा खरात यांच्या एक वर्षाच्या गायीच्या वासरावर बिबट्याने घरासमोर येवून हल्ला केला. ही घटना शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास घडली . बिबट्याने गायीच्या वासराला मानेला पकडले असता गायीच्या वासराने आरडाओरड केला असता बबन खरात यांनी बॅटरी घेवुन बाहेर येवून पाहिले असता वासराच्या मानेला पकडुन बिबट्या बसलेला होता. खरात यांनी आरडाओरड केला तेव्हा बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. बिबट्याच्या या हल्ल्यात वासरू जखमी झाले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here