Kokan: कास पाणी प्रश्न पेटला !

0
53
water shortage,
कास पाणी प्रश्न पेटला !

⭐नळपाणी कर्मचारी पाणी सोडण्यास हेळसांड करत असल्याने सरपंच प्रविण पंडीत यांनी ठराव घेऊन काढुन टाकले.सरपंचांच्या कारवाईवर एका सदस्याची हरकत पाणी येत नसल्याने भाईपवाडी ग्रामस्थ आक्रमक.

सुनिता भाईप / सावंतवाडी- कास भाईपवाडी गेली कित्येक वर्षे पाण्यापासुन वंचीत आहे. कोट्यावधी रूपयाचा निधी खर्च करूनही भाईपवाडीला पाणी पूरवठा होत नाही.नविन विहीर बांधुन पाईपलाईन पूर्ण करण्यात आली.विद्युत पोल घालण्यात आले पंप ही बसवण्यात आले मात्र तांत्रीक अणचणीमुळे एक विद्युत पोल घालण्यास अडचण असल्याने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.संध्या जुन्या नळपाणी योजनेचे पाणी सुरू आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-चंद्रनगर-शाळेतील-विद्या/

मात्र नळपाणी कर्मचारी पाणी सोडण्यात हेळसांड करत असल्याने पाणी येत ग्राम स्थांना मिळत नसल्याने भाईपवाडी ग्रामस्थानी ग्रामपंचायत मध्ये अर्ज दिला.ग्रामस्थांच्या अर्जावर सरपंचानी सदस्याची सभा बोलावुन अर्जाचे वाचन केल्यावर कर्मचार्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सर्व सभासदाच्या सहमंतीने ठराव घेऊन कर्मचार्याला कामावरून काढुन टाकण्यात आले.यावर एका सदस्याने मात्र हरकत घेत भाईपवाडी ग्रामस्थ खोट बोलतात त्याना पाणी पुरवठा होतो कर्मचार्याला काढता येणार नाही. तसेच सरपंचानी आमच्या प्रभागामध्ये येऊ नये आमच आम्ही बघु कर्मचार्याला आपल्या जबाबदारीवर ठेवण्याची जबाबदारी घेतली.यावर तोडगा काढण्यासाठी आज भाईपवाडी ग्रामस्थाना ग्रामपंचायत मध्ये बोलावुन चर्चा करण्यात आली.आक्रमक झालेल्या ग्रामस्थानी त्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली.सदस्यावर,ग्रामस्थाच्या सह्या घेऊन कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here