किर्लोस चव्हाणवाडी येथे बुधवारी श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून किर्लोस चव्हाणवाडी येथे उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी श्री संत शिरोमणी रविदास महाराज प्रतिष्ठानच्या वतीने वैभव नाईक यांचा सत्कार करत आभार मानण्यात आले. समाज बांधवांना संघटित करण्यासाठी चर्मकार समाज मंडळ राबवित असलेल्या उपक्रमांचे वैभव नाईक यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या.https://sindhudurgsamachar.in/kokan-चांगले-काम-करण्यासाठी-शर/
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाचे मालवण तालुका अध्यक्ष हरेश चव्हाण, सचिव श्री. कोरे सर, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, माजी सरपंच प्रदीप सावंत, उद्योजक बाबा सावंत,अजित लाड,रामगड सरपंच शुभम मठकर, उद्योजक बाळा मठकर, श्री संत शिरोमणी रविदास महाराज प्रतिष्ठान किर्लोसचे अध्यक्ष गुरुनाथ चव्हाण, शाखाप्रमुख विकास लाड, प्रवीण घाडीगावकर, राजू परुळेकर, पंढरीनाथ घाडीगावकर, स्वानंद भावे, अमित फोंडके,विलास घाडीगावकर,सुभाष धुरी, दशरथ घाडीगावकर,किशोर लाड, मानसी भावे, कांता भावे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.