कुडाळ — किरण शिंदे हे उध्दव ठाकरे यांचे निष्ठावंत कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.तसेच ते कुडाळचे रिक्षा चालक म्हणून त्यांची ओळख सर्वत्र आहे. किरण शिंदे यांची कुडाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष”पदी” निवड झाल्याने रिक्षा चालकांकडून तसेच कुडाळसह सिंधुदुर्गात सर्वत्र अभिनंदन होत आहे. https://sindhudurgsamachar.in/goa-गोव्यात-खून-झालेल्या-युव/
कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी दिड वर्षे पुर्ण करून आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा काही दिवसांपुर्वी दिला होता. त्यामुळे हे उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते.या उपनगराध्यक्ष पदावर आज शुक्रवारी उध्दव ठाकरे गटाचे किरण शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर या कुडाळच्या नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आहे.
तर आज शुक्रवारी कुडाळ नगरपंचायतीमध्ये निवडणूक अधिकारी तथा कुडाळच्या प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी उपनगराध्यक्ष”पदी” किरण शिंदे यांच्या नावाची घोषणा केली.हि निवड बिनविरोध झाली आहे.यावेळी नगराध्यक्ष सौ.अक्षता खटावकर, मुख्याधिकारी अरविंद नातू तसेच नगरपंचायतीचे नगरसेवक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.अक्षता खटावकर,नगरसेविका सौ.श्रेया गवंडे,माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक मंदार शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या अन्य नगरसेवकांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.