⭐या लोकसभा निवडणूक नियोजन बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण,माजी खासदार निलेश राणे हे सर्वजण उपस्थितीत राहणार आहेत.
कुडाळ:-आज बुधवार दि.३ एप्रिल रोजी दुपारी १२ -३० वाजता कुडाळ मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथील महालक्ष्मी हाॅलमध्ये भाजपची लोकसभा निवडणूक नियोजन संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीत पालकमंत्री रविंद्र चव्हाण,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,माजी खासदार निलेश राणे,आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार,माजी आमदार राजन तेली आदि इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ही लोकसभा निवडणूक नियोजन बैठक होणार आहे.अशी माहिती कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी दिली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-रत्नागिरी-सिंधुदुर्गाव/
⭐आजपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या दौऱ्यावर
रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. वास्तविक हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळाला पाहिजे अशी शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे. नारायण राणे राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना पुन्हा संधी देण्यात आली नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांना रत्नागिरी – सिंधुदुर्गमधून तिकीट दिले जाईल असे आश्वासन दिल्याचे बोलले जाते, मात्र अद्यापही या जागेवरील उमेदवार घोषित झालेला नाही. राणे उद्यापासून मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणार आहेत, तेव्हा शिवसेना शिंदे गटाचे नेते त्यांचे कसे स्वागत करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.