Kokan: कुडाळमध्ये दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा ; आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

0
126
कुडाळमध्ये दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा ; आ. वैभव नाईक यांची उपस्थिती
कुडाळमध्ये दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा ; आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

हुमरमळा येथे भव्य मोटार सायकल रॅली काढून,महिलांनी पुष्पवृष्टी करून व पुष्पहार घालून आ. वैभव नाईक यांचे केले जंगी स्वागत

हुमरमळा व कुडाळ शिवसेना शाखा येथील दहीहंडी उत्सवांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ

कुडाळ- शिवसेना युवासेनेच्या वतीने हुमरमळा येथे व शिवसेना-युवासेना कुडाळच्या वतीने शिवसेना शाखेसमोर गुरुवारी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून दहीहंडी उत्सवांचा शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर कुडाळ नक्षत्र टॉवर समोर हेल्प ग्रुपच्या दहीहंडी उत्सवाला आ. वैभव नाईक यांनी भेट देत या दहीहंडी उत्सवांना आ. वैभव नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. https://sindhudurgsamachar.in/kokan-पिक-विम्याच्या-रक्कमेसा/

हुमरमळा येथे प्रथमतः माड्याचीवाडी ते हुमरमळा पर्यंत भव्य मोटार सायकल रॅली काढून ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतशबाजीत,आ. वैभव नाईक यांच्यावर महिलांनी पुष्पवृष्टी करून,शिवसैनिकांनी पुष्पहार घालून आ. वैभव नाईक यांचा हुमरमळा गावात जल्लोषात स्वागत व सत्कार करण्यात आला.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते दहीहंडी उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी गावातील उद्योजकांचा, दहावी बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वेतोबा मालिकेत पपल्या भूमिका साकारणारा तनुष पडते याचा सत्कार करण्यात आला. तर आ. वैभव नाईक यांचे हुबेहूब चित्र काढणाऱ्या प्रेम परब यांचाही आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दहीहंडी निमित्त कुडाळ शिवसेना शाखा येथे लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स , ग्रुप डान्सचे आयोजन करण्यात आले. महिलांचे मनोरंजनाचे खेळ घेण्यात आले.तसेच डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता. यावेळी थर रचणाऱ्या गोविंदा पथकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

यावेळी हुमरमळा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका संघटक बबन बोभाटे,कुडाळचे शिवसेनेचे नेते अतुल बंगे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,ओबीसी सेल जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर, माजी उपसभापती जयभारत पालव, विभाग प्रमुख शेखर गावडे, सचिन काळप, राजू गवंडे, सुशील चिंदरकर,माजी सरपंच अर्चना बंगे, स्वप्नील शिंदे, कृष्णा तेली, मितेश वालावलकर,शाखा प्रमुख रमेश परब,ग्रामपंचायत सदस्य कांता माड्ये, ग्रामपंचायत सदस्य अमृत देसाई, ग्रामपंचायत सदस्या सौ सोनाली मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ रमा गाळवणकर, युवासेनेचे शाखाप्रमुख संदेश जाधव,आशिष परब,प्रवीण माळगी, ओमकार कानडे,स्नेहल सामंत आदी

कुडाळ येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक,शहर प्रमुख संतोष शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, कुडाळच्या नगरसेविका श्रेया गवंडे,सई काळप, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, संजय भोगटे,संदिप म्हाडेश्वर, काका कुडाळकर, माजी नगरसेविका मेघा सुकी, रोहीत भोगटे, चेतन पडते, अमित राणे, गोट्या चव्हाण,दीपक सावंत, नितीन सावंत, बाळा पावसकर, अमित सावंत,हेल्प ग्रुपचे बंड्या सावंत, बंटी तुळसकर,मंजुनाथ फडके,गुरु गडकर आदींसह सर्व शिवसेना युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिवसैनिक व कुडाळ वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        
    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here