Kokan: केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केसरकर यांची गांधी चौकात जाहीर सभा

0
37
Election 2024
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केसरकर यांची गांधी चौकात जाहीर सभा

केंद्रीय मंत्री नारायण राणे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केल्याचा पार्श्वभूमीवर आज रविवारी दुपारी अडीच वाजता राणे

*सावंतवाडी (प्रतिनिधी) : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभेत उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केल्याचा पार्श्वभूमीवर आज रविवारी दुपारी अडीच वाजता राणे आणि केसरकर यांची गांधी चौकात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ते कोणावर प्रहार करतात याकडे लक्ष वेधले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकण-रेल्वे-किती-वेगात-पू/

तळपत्या उन्हात गांधी चौकात होणार्‍या जाहीर प्रचार सभेत उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर बोलणार आहेत. आज सायंकाळी पाच वाजता निवडणूक जाहीर प्रचार संपणार आहे. या पार्श्वभूमीवर ही सभा तळपत्या उन्हात होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या टिकेला उत्तर या सभेतून दिले जाणार आहे. नारायण राणे व दिपक केसरकर यांची दिलजमाई झाल्यावर प्रथमच गांधी चौकात सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here