Kokan: कोंगळे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

0
41
शैक्षणिक साहित्य वाटप,
कोंगळे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

दापोली– दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद कोंगळे मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना येथील ग्रामस्थ व माजी विद्यार्थी असलेल्या राकेश साळवी व आरती साळवी यांचेकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-शिक्षक-संघाचे-प्रभागस्त/

जिल्हा परिषद मराठी शाळा कोंगळे येथे एका छोटेखानी समारंभात मान्यवर व्यक्तिंच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास, पाण्याची बाटली रंगपेटी, पेन यांसारख्या शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कोंगळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश साळवी, उपाध्यक्ष साक्षी साळवी, हर्षदा मोहीत, कोंगळे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आपले आईवडील, आपली शाळा, आपले शिक्षक यांना कधीही विसरु नको असा मोलाचा संदेश दिला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल राजेंद्र पाडवी यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक हनमंत गरंडे व प्रियांका वसावे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here