Kokan: कोकणातील आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत महावितरणच्या लाईनमनचे काम कौतुकास्पद

0
120
महावितरण लाईनमन
विद्युत क्षेत्रातील आघाडीचे नायक 'लाईनमन

कोकण परिमंडळ : वीजपुरवठा सुरळीत राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे वीज कर्मचारी, लाईनमन महावितरणचा कणा आहेत. कोकणातील भौगोलिक परिस्थितीत दुर्गम, दऱ्याखोऱ्यात विस्तारलेल्या विद्युत जाळयात दैनंदिन आपले काम करणे आव्हानात्मक आहे. महावितरणच्या लाईनमनची ही कामगिरी कौतुकास्पद आहे, असे मत अधिक्षक अभियंता मा.श्री. नितीन पळसुलेदेसाई यांनी व्यक्त केले. लाईनमन दिवसाच्या औचित्याने कोकण परिमंडळ कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.    https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ले-हापूस-ची-मार्/         

केंद्रशासनाने विद्युत क्षेत्रातील लाईनमनच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी   दि.04 मार्च रोजी लाईनमन दिवसाचे आयोजन देशपातळीवर करण्याचे निर्देश दिले.  लाईनमनच्या कार्याचे कौतुक, सुरक्षेबद्दल जागृती, कार्यक्षमतांचा विकास या हेतूने  कार्यक्रमांची रचना करण्यात आली होती.  पुढे बोलताना मा.श्री. नितीन पळसुलेदेसाई म्हणाले की,  निसर्ग व तौक्ते चक्रीवादळात वीज कर्मचाऱ्यांनी वादळ, पाऊस कशाचीही तमा न बाळगता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेऊन कोलमडलेली वीजयंत्रणा युघ्दपातळीवर उभी केली. लाईनमननी सुरक्षितपणे आपले कामकाज पार पाडावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी लाईनमनची समयोचित मनोगते झाली. महावितरणच्या कोकण परिमंडळ कार्यालयासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विभाग, उपविभाग व शाखा कार्यालयस्तरावर लाईनमन कर्मचाऱ्यांचे कौतुकाचा सोहळा उत्साहात  साजरा करण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षेची शपथ देण्यात आली.

परिमंडळातील कार्यक्रमास अध्यक्षस्थानी सहाय्यक महाव्यवस्थापक(मानव संसाधन) मा.श्री.वैभव थोरात तर कार्यकारी अभियंता मा.श्री. रामलिंग बेले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मा.श्री.अप्पासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपव्यवस्थापक (मानव संसाधन) मा.श्री. संजय वैशंपायन यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here