Kokan: कोकणातील गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वेकडे इंजिनासह बोगीची कमतरता; दुपदरीकरण तातडीने करावे

0
115
कोकण, पर्यटन, जल वाहतुक मोहन केळुसकर
कोकणातील गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वेकडे इंजिनासह बोगीची कमतरता;एसटीने प्रवाश्यांच्या मागणीनुसार उपनगरांतुन गाड्या सोडाव्यात मोहन केळुसकर दुपदरीकरण तातडीने करावे एसटीने प्रवाश्यांच्या मागणीनुसार उपनगरांतुन गाड्या सोडाव्यात मोहन केळुसकर

एसटीने प्रवाश्यांच्या मागणीनुसार उपनगरांतुन गाड्या सोडाव्यात – मोहन केळुसकर

कणकवली I भाई चव्हाण: गणेशोत्सवाचा वेध लागलेल्या चाकरमान्यांनी भल्या पहाटेपासून आरक्षणासाठी प्रयत्न सुरू केलेत.‌ पण अवघ्या काही मिनिटभरात आरक्षणासाठी प्रतिक्षा यादी दिसू लागली. त्यात काय गोलमाल आहे ते चौकशी अंती समजेल. मात्र सद्य परिस्थितीत भारतीय रेल्वे कडे इंजिनासह बोगींची कमतरता आहे. कोकण रेल्वे ही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने दक्षिणोत्तर जोडणारा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-येथील-आकाश-फिश/

विद्यमान परिस्थितीत एसटी महामंडळाने गणेशोत्सव कालावधीत प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई उपनगरातील भागाभागांतून एसटीच्या फेर्या सुरू कराव्यात. त्यामुळे खाजगी गाड्यांच्या मनमानी तिकीट वाढीला आळा बसेल, असेही मत केळुसकर यांनी व्यक्त केले आहे.

कोविआची बैठक दादर-मुंबई कार्यालयात झाली. त्यावेळी केळुसकर बोलत होते. यावेळी पदाधिकारी एकनाथ दळवी, भाऊसाहेब परब, सूर्यकांत पावसकर, मनोहर डोंगरे, रमाकांत जाधव, चंद्रकांत आम्रे, राजन केळुसकर, संतोष दळवी, प्रकाश तावडे आदी उपस्थित होते. कोकण रेल्वेने नियमित गाड्या व्यतिरिक्त गणेशोत्सव कालावधीत प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या सोडण्याचे जाहीर केले आहे. मात्र सद्या या एकच मार्गिकेवरुन प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांची संख्या शंभरी पार जात असते. त्यामुळे सर्वंच गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून पडते. त्यामुळे केंद्र शासनाने कोरेच्या दुपदरीकरणाचे काम तातडीने सुरू केले पाहिजे, अशी मागणी करुन ते म्हणाले, भारतीय रेल्वे बोर्डाकडून रेल्वेच्या विकासासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे भविष्यात अपेक्षित इंजिने आणि बोगी उपलब्ध होत जातील. मात्र या रेल्वेसाठी त्याग करणार्या कोकणवासिया़ंच्या सुलभ प्रवासासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.

राज्य सरकारने एसटी मधून प्रवास करणार्या महिलांसाठी ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या लक्षणीय वाढत आहे. मात्र त्याप्रमाणात एसटी गाड्यांची संख्या अपुरी पडत आहे. एसटीच्या प्रशासकीय अधिकारी वर्गांने तन, मन, धन अर्पण करून एसटीच्या उर्जितावस्थेसाठी मार्ग काढणे आवश्यक आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही सहकार्य केले पाहिजे. शासन स्तरावर आवश्यक सहकार्य मिळाले पाहिजे. तरच ही प्रवाशांची जीवन वाहिनी जिवंत राहिल. यावेळी उपस्थितांनी आपल्या भागातील अडचणी मांडल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here