कापणीच्या आधी पंचनामे करुन नुकसान भरपाई वेळेत मिळावी काँग्रेसची मागणी – अशोकराव जाधव
प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
चिपळूण -संपूर्ण कोकणात भात , नाचणी ,वरी तयार झालेली पिके कापणीला आली असताना अती पावसाने पिके हातची गेली आहेत. त्यामुळे सरकारने कोकणातील सर्व जिल्हामध्ये भात , नाचणी शेतीची नुकसानाची पाहणी करून पंचनामे घालावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-प्रोटोलॉजी-लेझर-मशीन-मं/
सदर मागणी कोकणातील सर्व ऊपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात येणार असुन त्याची सुरवात चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून अशोकराव जाधव अध्यक्ष सामाजीक न्याय विभाग प्रदेश काँग्रेस महाराष्ट्र आणि अध्यक्ष शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र यांनी केली आहे . सदर निवेदनात शेतीच्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई देणेची मागणी करण्यात आली आहे . निवेदन चिपळूण ऊपविभागीय अधिकारी पवार यांचेकडे देताना मा अशोकराव जाधव यांचे सोबत शिष्टमंडळामध्ये राजेश मुल्लाजी ,समिर रेडीज , महादेव चव्हाण , अल्पेश मोरे ,बशीर बेबल , शिवाजी पवार इत्यादी बहुसंख्यने कार्यकर्ते ऊपस्थित होते


