Kokan: कोल्हापूर रेल्वेमार्ग जलदगतीने मार्गी लावावा; नारायण राणेंची रेल्वेमंत्र्यांकडे आग्रही मागणी

0
11
वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्ग
वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्ग जलदगतीने मार्गी लावावा; नारायण राणेंची रेल्वेमंत्र्यांकडे आग्रही मागणी

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कणकवली

वैभववाडी ते कोल्हापूर असा नवा रेल्वेमार्ग केवळ कोकणसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देणारा ठरणार आहे. या रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे.आता वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे लाईनचे बांधकाम जलदगतीने मार्गी लावण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घालण्याची आग्रही मागणी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन केली. यावेळी कोकण रेल्वेच्या अनेक समस्या, स्थानकाचे प्रश्न मांडतानाच मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वेच्या थांबे देण्याबाबतही त्यांनी रेल्वे मंत्र्याचे लक्ष वेधले. जिल्हा मुख्यालयातील सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकांवरील सुविंधाबाबतही खासदार नारायण राणे यांनी सांगतानाच या रेल्वेस्थानकावर ४ एक्सप्रेसना थांबा मिळण्याची मागणीही केली. कोल्हापुर मार्गाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत यावेळी रेल्वेमंत्र्यांनी आश्वासीत केले.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here