वेंगुर्ला प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावी परीक्षेचा वेंगुर्ला तालुक्याचा निकाल ९९.६३ टक्के लागला. संपूर्ण तालुक्यात बारावी परीक्षेला बसलेले ८२७ पैकी ८२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बॅ.खर्डेकर महाविद्यालयाची विज्ञान शाखेची सारिकाकुमारी यादव ही ९१.८३ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे. तर वेतोरे हायस्कूलच्या विज्ञान शाखेची सिद्धी भिडे ही ८९.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय व अ.वि.बावडेकर शिरोडा महाविद्यालयातील किमान कौशल्य शाखेतील ऋतुजा उगवेकर ही ८९.३३ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. तसेच तालुक्यात श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.सौ.गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे व शिरोडा बा.म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालय व तांत्रिक संकुल या महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-नागपूर-येथील-चार-मंदिरा/
बॅ.खर्डेकर महाविद्यालयातून बारावी परीक्षेला बसलेल्या २७८ विद्यार्थ्यांपैकी २७६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन एकूण निकाल ९९.२८ टक्के लागला. वाणिज्य शाखेतून बसलेले ६१ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यात मंगल शेणई-५३१ (८८.५० टक्के), पूर्वा करंगुटकर-५२५ (८७.५० टक्के), सानिका मांजरेकर-५१३ (८५.१३ टक्के), विज्ञान शाखेतून बसलेले १२३ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यात सारिकाकुमार यादव-५५१ (९१.८३ टक्के), विदवत्ता वारंग-५३१ (८८.५० टक्के), मिताली कोयंडे-५१९ (८६.५० टक्के), किमान कौशल्यमधून बसलेल्या ४६ विद्यार्थ्यांपैकी ४५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९७.८२ टक्के लागला. यात भाग्यश्री केरकर-४४३ (७३.८३ टक्के), गौरेश पेडणेकर-४२९ (७१.५० टक्के), सदानंद प्रभू-४२३ (७०.५०), कला शाखेतून बसलेले ४८ पैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९७.९२ टक्के लागला. यात सानिका वरसकर-५१२ (८५.३३ टक्के),सानिका करंगुटकर-४९५ (८२.५० टक्के), ईशा भोसले-४५७ (७६.१७ टक्के) यांनी गुण मिळविले.
रा.कृ.पाटकर हायस्कूल आणि रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेज तांत्रिक व व्यवसाय अभ्यासक्रम वेंगुर्लामधून एकूण १०६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १०५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९९.०५ टक्के लागला. कला शाखेतून बसलेले १२ पैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९१.६७ टक्के लागला. यात प्रशांत कामत-३६५ (६०.८३ टक्के), सेजल जाधव-३६० (६० टक्के), रितेश म्हाकले-३५१ (५८.५० टक्के), वाणिज्यमधून बसलेले ५२ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यात महादेव मठकर-४६९ (७८.१७ टक्के), श्रावणी चिपकर-४५३ (७५.५० टक्के), पद्मजा नाईक – ४५१ (७५.१७ टक्के), किमान कौशल्यमधून बसलेले ४२ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यात प्रथमेश मांजरेकर-४९६ (८२.६७ टक्के), शिवानी होडावडेकर-४७० (७८.३३ टक्के), दिव्या वेळकर-४३९ (७३.१७ टक्के) यांनी गुण मिळविले.
श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय, वेतोरेमधून बसलेले १४७ही विद्यार्थी उत्तीर्ण निकाल १०० टक्के लागला. कला शाखेतून बसलेले २८ही विद्यार्थी उत्तीर्ण निकाल १०० टक्के लागला. यात ओंकार तुळसकर-३९७ (६६.१७ टक्के), आदित्य धर्णे-३८१ (६३.५० टक्के), तंझीला बसापूर-३७२ (६२ टक्के), वाणिज्यमधून बसलेले ५८ ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यात समिर परब-५१७ (८६.१७ टक्के), कावेरी धुरी-५१६ (८६ टक्के), महिमा आमडोसकर-५०८ (८४.६७ टक्के), स्वयंअर्थसहाय्यीत विज्ञान शाखेतून बसलेले ६१ ही विद्यार्थी उत्तीर्ण निकाल १०० टक्के लागला. यात सिद्धी भिडे-५३८ (८९.६७ टक्के), प्रणव नाईक-५०३ (८३.८३ टक्के), स्वरदा बोवलेकर-४८७ (८१.१७ टक्के) यांनी गुण मिळविले.
शिरोडा येथील बा.म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालयातून बसलेल २९६ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. कला शाखेतून बसलेले ३२ ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यात मानसी सारंग-४३२ (७२ टक्के), दिक्षा आरोलकर व चैताली सोन्सुरकर-३७४ (६२.३३ टक्के), ऋषिकेश भेरे-३७३ (६२.१७ टक्के), वाणिज्य शाखेतून बसलेले ८१ ही विद्यार्थी होऊन निकाल १०० टक्के लागला. यात अनुष्का केरकर-४९६ (८२.६७ टक्के), तन्वी गावडे-४८७ (८१.१७ टक्के), कादंबरी मस्के-४८४ (८०.६७ टक्के), विज्ञान शाखेतून बसलेले १०५ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यात हर्ष कदम-५२१ (८६.८३ टक्के), साई निखार्गे-४९० (८१.६७ टक्के), उत्तम चिपकर-४८९ (८१.५० टक्के), अकौटींग अॅण्ड ऑफिस मॅनेजमेंटमधून बसलेले २१ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यात ऋतुता उगवेकर-५३६ (८९.३३ टक्के), ऋग्वेदी नागवेकर-५३४ (८९ टक्के), रुद्धिका कृष्णाजी-५१५ (८५.८३ टक्के), इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजीमधून बसलेले २८ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यात तेजस तेली-४७० (७८.३३ टक्के), सावळाराम पेडणेकर-४३९ (७३.१७ टक्के), साहिल जोशी-४३४ (७२.३३ टक्के), ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीचा निकालही १०० टक्के लागला. यात रितेश जाधव-४३६ (७२.६७ टक्के), आयुष केरकर-४१० (६८.३३ टक्के), पारस राऊत-३८० (६३.३३ टक्के) यांनी गुण मिळविले.
फोटो – सारिकाकुमारी यादव, सिद्धी भिडे, ऋतुजा उगवेकर, मंगल शेणई, भाग्यश्री केरकर, सानिका वरसकर, ओंकार तुळसकर, समिर परब,