खेड-(प्रतिनिधी) : खेड मध्ये माणुसकीला काळीमाफासणारी घटना घडली आहे. नराधम बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाली असून पिडित मुलीच्या आईने पतिविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. ही घटना १४ सप्टेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत घडलेली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-स्वरचित-काव्यवाचन-स्पर्/
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील एका गावात सख्ख्या मुलीवर नराधम बापाने अत्याचार केला आहे. हा बलात्काराचा प्रकार पिडित मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने थेट पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी भादवि कलम ३७६ (२फ) व बालकांचे संरक्षण कायदा कलम ४, ६, ८ आणि १० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल झाल्यापासून नराधम बाप घरातून बेपत्ता झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.