खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी दादरची पॅसेंजरची दिवा पॅसेंजर केल्यामुळे मुंबई शहर, पश्चिम उपनगर, घाटकोपर, भांडुप, वसई, विरार, ठाणे परिसरातील कोकणी बांधवांना प्रवास करताना अनेक अडचणी येत आहेत. प्रवाशांना होणारा हा त्रास लक्षात घेऊन जल फाउंडेशनने दिवा-रत्नागिरी गणपती विशेष मेमू ही ( 01153/01154) दादर- रत्नागिरी मार्गावर ठाणे, दिवा, पनवेल, पेण, नागोठणे व पुढे रोहा ते रत्नागिरी दरम्यान सर्व थांबे देऊन नियमित करण्याची मागणी मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharsahtra-108-आरोग्य-सेवा-रुग्णवाहिक/
जवळपास वीस वर्षे सुरू असलेली रत्नागिरी दादर पॅसेंजर ची दिवा पॅसेंजर केल्यामुळे मुंबई शहर, पश्चिम उपनगर, घाटकोपर, भांडुप, ठाणे परिसरातील कोकणी बांधवांना प्रवास करताना अनंत अडचणी येत आहेत. कित्येकांनी त्या गाडीने प्रवास करणेच सोडून दिले आहे. कोकण मार्गावरील काही स्थानकांवर केवळ सावंतवाडी दिवा व रत्नागिरी दिवा या दोनच गाड्या थांबतात. परंतु दिवा सावंतवाडी पकडण्यासाठी उत्तर मुंबईतील व पालघर विभागातील पश्चिम रेल्वे प्रवाशांना पहाटे ३ वाजता घर सोडावे लागते तर सावंतवाडी दिवा ने आल्यावर घरी पोहोचायला रात्री ११-१२ वाजतात. त्याचप्रमाणे रत्नागिरी दिवा पॅसेंजरचा प्रवासही त्रासदायकच आहे. त्यामुळे अनेकांनी रेल्वेचा पर्याय निवडणे बंद केले आहे.
दरम्यान, सर्व प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन जल फाउंडेशनने दिवा -रत्नागिरी गणपती विशेष मेमू दादर ते रत्नागिरी मार्गावर ठाणे, दिवा, पनवेल, पेण, नागोठणे व पुढे रोहा ते रत्नागिरी दरम्यान सर्व थांबे देऊन नियमित करण्याची मागणी मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.