Kokan: गावा गावातील प्राथमिक शाळा टीकवण्यासाठी पालक आणि ग्रामस्थ यांनी सहकार्य केले पाहिजे – अतुल बंगे

0
19
वेताळ बांबार्डे,
गावा गावातील प्राथमिक शाळा टीकवण्यासाठी पालक आणि ग्रामस्थ यांनी सहकार्य केले पाहिजे - अतुल बंगे

वेताळ बांबार्डे गडकरी वाडी जि प पुर्ण प्राथमिक शाळा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कुडाळ-

कुडाळ (प्रतिनिधी) गावातील प्राथमिक शाळा बंद पडत आहेत गावातील विद्यार्थी माध्यमिक शाळांकडे ओढा असल्याने प्राथमिक शाळा टीकवण्यासाठी पालक आणि ग्रामस्थ यांनी समन्वय साधुन सहकार्याची भूमिका बजवावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांनी केले.वेताळ बांबार्डे जि प पर्ण प्राथमिक शाळा गडकरी वाडा या शाळेचे स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून श्री बंगे बोलत होते.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एसटी-महामंडळाचा-व्यसनी/

यावेळी श्री बंगे बोलताना पुढे म्हणाले या शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि पालक व ग्रामस्थ यांची उपस्थिती पहाता आपल्या गावातील शाळा ही आपुलकी दीसुन येते तसेच विद्यार्थ्यांची प्रगती पहाता शिक्षकांनी घेतलेली मेहनत फळाला आलेली दीसुन येते असे सांगुन पालकांच्या व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून शाळेच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी घेतलेली मेहनत खूप कौतुकास्पद आहे असेही गौरवोद्गार श्री बंगे यांनी काढले

यावेळी आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण व विविध स्पर्धामध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थी यांचा भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशांत सावंत, उपसरपंच श्री प्रदीप गावडे, वेताळ बांबार्डे सोसायटी चेअरमन तथा शिक्षण तन्न्य श्रीकृष्ण भोसले, केंद्र प्रमुख श्री तळेकर सर, ग्रामपंचायत सदस्य दशरथ कदम, नारायण गावडे, अशोक डांगे, वसंत यादव, सौ स्नेहा दळवी, मुख्याध्यापीका सौ सावंत उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here