🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l दापोली –
दापोली तालुक्यातील गिम्हवणे केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा नुकत्याच मौजे दापोली येथील श्री जानाई देवी क्रीडानगरीत पार पडल्या. दोन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मौजे दापोली गावच्या सरपंच अंजली पवार, मौजे दापोली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज बुरटे, मौजे दापोली तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय शिगवण, रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर कालेकर, मौजे दापोली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष अनिल भुवड, मौजे दापोली महिला मंडळ अध्यक्षा संजना भुवड, पोलीस पाटील कुलदीप पवार, दापोली शिक्षण प्रभागाचे विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, मौजे दापोली शाळेचे मुख्याध्यापक भरत गिम्हवणेकर, गिम्हवणे केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका मुग्धा सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-नेरूर-येथील-श्री-कलेश्वर/
गिम्हवणे केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धेसाठीच्या उद्घाटनपर समारंभात क्रीडाज्योतीचे प्रज्वलन, क्रीडाध्वजाचे ध्वजारोहण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गिम्हवणे केंद्रातील चंद्रनगर, गिम्हवणे, दापोली नं.१, दापोली कन्याशाळा, मौजे दापोली, जोगेळे नं.१, जोगेळे नं.२, शिवाजीनगर किरांबा, शिवाजीनगर भौंजाळी, दापोली उर्दु आदी शाळांतील विद्यार्थी या केंद्रस्तरीय क्रीडामहोत्सवात सहभागी झाले होते. सलग दोन दिवस चाललेल्या या केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आला. आता गिम्हवणे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी झालेले सर्व खेळाडू दापोली प्रभागस्तरीय क्रीडास्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांनी सर्व खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.