दापोली- मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेतील सहभागी शाळांचा अंतिम निकाल जाहीर झाला असून सरकारी प्राथमिक शाळा गटात तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गिम्हवणे या शाळेने दापोली तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. नुकताच दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट )चे प्राचार्य सुशिलकुमार शिवलकर साहेब डायटचे अधिव्याख्याता मा बर्वे सर, प्रा निकुंब सर आदिंनी गिम्हवणे शाळेस भेट देऊन शाळेचा समारंभपूर्वक सन्मान केला. https://sindhudurgsamachar.in/kokan-को-शि-म-संघाचे-मा-आ-ज्ञाने/
यंदाच्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शाळांसाठी ‘मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा’ स्पर्धा आयोजित केली होती. राज्यातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. वरिष्ठ अधिकारी व तज्ञ व्यक्तिंच्या पथकांनी प्रत्येक शाळेस भेट देऊन या स्पर्धेअंतर्गत शाळेचे मूल्यमापन केले होते. आता शासनाने या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर केला असून गिम्हवणे शाळेने दापोली तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून या शाळेचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
गिम्हवणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मानसी दुबळे व उपाध्यक्ष अमोल येलवे व सर्व सदस्य . गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका मुग्धा सरदेसाई, शाळेतील शिक्षक रश्मी शिगवण, प्रिया पवार, निर्मला पारदुले, प्रणिता तोडणकर, ऋतुजा उजाळ आदींनी गिम्हवणे शाळा सर्व निकषांतून स्वच्छ व सुंदर होण्यासाठी परिश्रम घेतले होते. याशिवाय गिम्हवणे गावच्या सरपंच साक्षी गिम्हवणेकर, उपसरपंच शैलेश खळे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख रमाकांत शिगवण, श्री काटकर सर , दापोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, गटविकास अधिकारी सुनील खरात आदी अनेकांचे सहकार्य लाभले होते. गिम्हवणे गावातील सर्व ग्रामस्थ व पालकांनीही शाळेच्या यशासाठी अविरत प्रयत्न केले होते. गिम्हवणे शाळेच्या प्रयत्नांची आता शासनाने दखल घेतली असून मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत शासकीय प्राथमिक शाळा गटात गिम्हवणे शाळेने प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. गिम्हवणे शाळेने संपादन केलेल्या या यशाचे सर्वांनी कौतुक केले असून या शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.