Kokan: ग्रंथदिडीने साहित्य संमेलनाला प्रारंभ

0
15
ग्रंथदिडी,साहित्य संमेलन,
ग्रंथदिडीने साहित्य संमेलनाला प्रारंभ

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार /वेंगुर्ला /प्रतिनिधी-
आनंदयात्री वाङ्मय मंडळासहेे अन्य सहयोगी संस्थांनी आयोजित केलेल्या वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक चौथ्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातून काढण्यात आलेल्या ग्रंथदिडीचे उद्घाटन गोखले कॉलेजचे निवृत्त प्राचार्य तथा संमेलनाच्या अध्यक्षा प्रा.माधुरी शानभाग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाल. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

संमेलनाच्या निमित्ताने आज सायंकाळी बॅ.खर्डेकर महाविद्यालय ते संमेलन स्थळापर्यंत (साई मंगल कार्यालय) ग्रंथदिडी काढण्यात आली. या ग्रंथदिडीत श्री शिवाजी प्रागतीक शाळेचा चित्ररथ, ढोल पथक, आनंदयात्री महिला, मठ येथील रा.धों.खानोलकर हायस्कूलचे लेझीम पथक, श्री शिवाजी हायस्कूल तुळसचे झांज पथक, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे एनएसीसी कॅडेटस्, रा.कृ.पाटकर हायस्कूल आणि बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक तसेच साहित्यप्रेमी सहभागी झाले होते.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-सातारा-जिल्हा-परिषद-शिक/

यावेळी आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष वृंदा कबळी, प्रा.सचिन परुळकर, रविद्र परब, राजाराम नाईक, सुनिल नांदोसकर, अजित राऊळ, महेश राऊळ, शैलेश जामदार, अवधूत खानोलकर, पांडुरंग कौलापुरे, आनंद बांदेकर, प्रा. महेश बोवलेकर, प्रसन्ना देसाई, जनार्दन शेटये, प्रा. वैभव खानोलकर, राकेश वराडकर, बाबूराव खवणेकर, जयराम वायंगणकर, प्रसाद खानोलकर, प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, संजय पाटील, गुरुदास तिरोडकर, महेंद्र घाडी, महिमा घाडी, माधवी मातोंडकर, किरात ट्रस्टचे अॅड.शशांक मराठे, सीमा मराठे, डॉ.संजिव लिगवत, पी.के.कुबल, दाजी परब, भाऊ केरकर, त्रिबक आजगांवकर यांच्यासह बहुसंख्य साहित्यप्रेमी उपस्थित होते.

रविवारी साई मंगल कार्यालय येथे सकाळी साहित्य संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. यात कादंबरी पुरस्कार वितरण, साहित्य गौरव पुरस्कार, ‘मराठाची बोलू कौतुके‘ हा मराठी साहित्य व मराठी लोकसंस्कृती यांचे दर्शन घडविणारा विशेष कार्यक्रम, ‘संध्या छाया‘ नाटकातील प्रवेश, निमंत्रितांचे कवी संमेलन आणि विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण होणार आहे.

फोटोओळी – साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या ग्रंथदिडीला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here