Kokan: ग्रामस्थांच्या विकासाच्या सर्व मागण्या पूर्णत्वास नेणार -आ. वैभव नाईक

0
55
ग्रामस्थांच्या विकासाच्या सर्व मागण्या पूर्णत्वास नेणार -आ. वैभव नाईक
ग्रामस्थांच्या विकासाच्या सर्व मागण्या पूर्णत्वास नेणार -आ. वैभव नाईक

जांभवडे, भडगाव, पांग्रड, कडावल गावात आ. वैभव नाईक यांचा गावभेट दौरा संपन्न

कुडाळ – जांभवडे, भडगाव, पांग्रड, कडावल गावात आमदार वैभव नाईक यांनी गावभेट दौरा केला. यावेळी गावात बैठका आयोजित करून आ. वैभव नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. गावातील पूर्ण कऱण्यात आलेल्या आणि प्रलंबित असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला.शिवसेना संघटना वाढीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालूका संघटक बबन बोभाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. https://sindhudurgsamachar.in/kokan-पी-एम-किसान-योजनेच्या-प्/

यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, जनतेने माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकावर विश्वास ठेवून दोन वेळा निवडून दिले. मतदारसंघात जनतेला अभिप्रेत असलेला विकास करण्याचा प्रयत्न मी करीत आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास कामे करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्हावासियांचे स्वप्न असलेले शासकीय मेडिकल कॉलेज, कुडाळ महिला बाल रुग्णालय सुरु झाले असून जनतेला याचा लाभ होत आहे. यापुढेही ग्रामस्थांच्या विकासाच्या ज्या काही मागण्या असतील त्या सर्व पूर्णत्वास नेल्या जाणार आहेत.पुढील वर्षे निवडणुकांचे असणार आहे. त्यामुळे सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी संघटना वाढीवर भर द्यावा असे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले.

याप्रसंगी जांभवडे येथे उपतालुका प्रमुख महेश सावंत, युवासेना विभाग प्रमुख निशांत तेरसे,शाखा प्रमुख तेजस4 भोगले, ग्रा. प. सदस्य उदय मडव,सोनवडे सोसा. चेअरमन काशीराम घाडीगावकर,माजी सरपंच विठ्ठल तेली,दत्तप्रसाद मेस्त्री,मधुकर पाटील,दिलीप सावंत,रविकांत खांडेकर, विजय पतियाणे, मोहन सुर्वे,आप्पा रेडकर,पंढरी राणे,

भडगाव येथे उपसरपंच बाबी गुरव, श्रीनिवास नाईक, कृष्णा घाडी,समीर लोट,आनंद लोट, राजू लोट, ताता सावंत, अरुण माळकर, हेरंब सामंत,राजाराम गुरव, जनार्दन गुरव, सुनील गुरव, सुहास गुरव, तेजस माळकर,संतोष ढोकरे, अरविंद बागवे,पांडुरंग लोट,दाजी लोट, सोनाली सावंत,स्नेहल नाईक, संतोष सावंत.

पांग्रड येथे उपविभाग प्रमुख मंगेश मर्गज, शाखा प्रमुख विश्वनाथ मर्गज,उपशाखा प्रमुख संजय कदम, ग्रा.प. सदस्य मनीषा मर्गज, पल्लवी मर्गज,तंटामुक्ती अध्यक्ष शरद मर्गज,आनंद मर्गज,सुरेश मर्गज,सदानंद तावडे, जनार्दन मर्गज,पुरुषोत्तम मर्गज, यशवंत तांबे.

कडावल येथे विभाग प्रमुख नरेंद्र राणे, सरपंच शीतल कल्याणकर, ग्रा. प. सदस्य विजय गावठे,व्यापारी संघाचे अध्यक्ष गुरु मुंज, विलास गुरव, विद्याधर मुंज, राजेंद्र मुंज,गुरुनाथ मुंज,विष्णू गुरव,सहदेव गुरव,भाई गुरव आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here