Kokan: चंद्रनगर शाळेचे घवघवीत यश

0
110
चंद्रनगर शाळेचे घवघवीत यश
चंद्रनगर शाळेचे घवघवीत यश

दापोली- दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील श्री गजानन महाराज भक्त मंडळाने श्री गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त आयोजित केलेल्या दापोली तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर या शाळेने घवघवीत यश संपादन केले असून या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-बेळगाव-शहराजवळ/

दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील श्री गजानन महाराज भक्त मंडळ दरवर्षी श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्यानिमित्त दापोली तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करते. यावर्षी आयोजीत केलेल्या तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये शेतकरीनृत्य प्रकारात चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक, टीपरीनृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक, कोळीनृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक, प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक, देशभक्तिपर गीतगायन स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला आहे.

याशिवाय वैयक्तिक स्पर्धांमध्ये वर्चस्व राखताना चंद्रनगर शाळेतील आरोही मुलूख व नीरजा वेदक यांनी एकपात्री अभिनय स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक, नक्कल स्पर्धेत कु. आरोही मुलूख हिने प्रथम क्रमांक, निबंधलेखन स्पर्धेत वेदिका मुलूख हिने तृतीय क्रमांक, उतारालेखनमध्ये प्रसाद शिगवण याने तृतीय क्रमांक, उतारावाचन स्पर्धेत आरोही मुलूख हिने उत्तेजनार्थ, ज्ञानकुंभ स्पर्धेत वेदिका मुलूख हिने उत्तेजनार्थ, भक्तिगीत गायन स्पर्धेत नीरजा वेदक हिने द्वितीय, ढोलकी वादन स्पर्धेत दीप शिगवण याने प्रथम, पाठांतर स्पर्धेत वेदिका मुलूख हिने प्रथम, शमिका मुलूख हिने द्वितीय, पाठांतर स्पर्धेतील दुसर्‍या गटात विराज मुलूख याने प्रथम, नीरजा वेदक हिने तृतीय, निहाल मुलूख याने उत्तेजनार्थ, हस्तकला स्पर्धेत शमिका मुलूख हिने प्रथम, नीरजा वेदक हिने द्वितीय, पुर्वा जगदाळे हिने तृतीय, चित्रकला स्पर्धेत शमिका मुलूख हिने तृतीय, पुर्वा जगदाळे हिने उत्तेजनार्थ, रंगभरण स्पर्धेत सौम्या बैकर हिने द्वितीय तर वीर अबगुल याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धांसाठी चंद्रनगर शाळेतील शिक्षक अर्चना सावंत, मानसी सावंत, मनोज वेदक, बाबू घाडीगांवकर, श्वेता मुलूख यांनी परिश्रम घेतले होते. विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय व घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे चंद्रनगर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, दापोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, दापोलीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, रत्नागिरी जिल्हा परिषद नियोजन समितीचे सदस्य मोहन मुळे आदी अनेकांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here