दापोली- स्वीप मतदार जनजागृती अभियानाचा एक भाग म्हणून दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेत नुकतेच शाळास्तरीय निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल होते. इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-निवडणूक-निकालानंतरच-तल/
मतदार जनजागृती अभियान अंतर्गत सध्या विविध स्तरांवर प्रबोधन व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने ‘स्वीप’ कार्यक्रमातंर्गत मतदार जनजागृती अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून सर्व व्यवस्थापन व माध्यमाच्या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून चंद्रनगर शाळेत विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत वेदिका मुलूख हिने प्रथम, नीरजा वेदक हिने द्वितीय तर पुर्वा जगदाळे हिने तृतीय क्रमांक पटकावला. शाळेतील शिक्षक बाबू घाडीगांवकर व मनोज वेदक यांनी या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत व मानसी सावंत यांनी अभिनंदन केले आहे.