Kokan: चंद्रनगरच्या आरोही मुलूखची इस्रोवारी

0
88
चंद्रनगरच्या आरोही मुलूखची इस्रोवारी
चंद्रनगरच्या आरोही मुलूखची इस्रोवारी

दापोली- रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत ‘नासा-इस्रोस विद्यार्थी भेट’ उपक्रमांतर्गत झालेल्या निवड चाचण्यांमध्ये घवघवीत यश संपादन केल्याने दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेत इयत्ता पाचवीत शिकणारी विद्यार्थीनी कु. आरोही महेश मुलूख हिची इस्रो वारीसाठी निवड झाली आहे. नुकतीच आरोही इतर पात्र विद्यार्थ्यांसोबत इस्रोकडे रवाना झाली आहे. दापोली पंचायत समिती येथे एका शानदार कार्यक्रमात दापोली तालुक्यातून पात्र ठरलेल्या पाच विद्यार्थ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.https://sindhudurgsamachar.in/बॅ-खर्डेकर-महाविद्यालयात/

इस्रो वारीसाठी पात्र ठरलेली इयत्ता पाचवीत शिकणारी आरोही एकमेव विद्यार्थीनी असून इतर विद्यार्थी इयत्ता सहावी व सातवीत शिकणारे आहेत. हे सर्व विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षकांसह इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेस भेट देणार असून आशिया खंडातील सर्व प्रमुख शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या विज्ञान संमेलनासही भेट देणार आहेत. विमानाने प्रवास केलेली आरोही ही चंद्रनगर गावातील पहिलीच मुलगी असून तिचे चंद्रनगर गावातील अनेकांनी कौतुक केले आहे. आरोही हिस शाळेतील शिक्षक मानसी सावंत, बाबू घाडीगांवकर, मनोज वेदक व मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांचे मार्गदर्शन लाभले असून इस्रोच्या मोहीमेसाठी दापोली येथून रवाना झाल्याबद्दल चंद्रनगरच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, उपसरपंच राजेंद्र मिसाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, दापोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, दापोली तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, गटविकास अधिकारी सुनील खरात, जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य मोहन मुळे आदी मान्यवरांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here