मुंबईतील घाटकोपर पश्चिम येथील अल्ताफ नगर, गोळीबार रोड परिसरातील श्री, शिवाजी घाणेकर यांच्या निवासस्थानी श्री गणेश चतुर्थीच्या दिनी श्री गणरायांचे आगमन झाले असून सालाबादप्रमाणे याही वर्षी त्यांनी बाप्पांसाठी कागद, पुठ्ठा आणि कापड यांचा वापर करून आकर्षक इको फ्रेंडली सजावट साकारली आहे.
यानिमित्ताने मॅकॉलेप्रणित आधुनिक शिक्षण पद्धतीचे दुष्परिणाम आणि भारतीय वैदिक शिक्षण पद्धतीचे महत्व विशद करणारा सुंदर देखावा त्यांनी उभारला आहे. ख्रिस्ताब्द पूर्वकाळात सर्वत्र गुरुकुल शिक्षण पद्धती असताना १०० टक्के साक्षरतेचे प्रमाण असलेल्या भारतात आज सर्व काही सुविधा उपलब्ध असूनही हे प्रमाण कमालीचे घटले आहे. भारतातील अनेक भागांत आजही गुरुकुल कार्यरत असून त्यामध्ये भारतीय प्राचीन ग्रंथ परंपरांचे, संस्कृतीचे आणि सोबत आधुनिक शिक्षणही दिले जाते. विद्यार्थ्यांची जात-पात विचारात न घेता इथे मुलांना प्रवेश दिला जातो. मुलींसाठीही स्वतंत्र गुरुकुल स्थापन झाले असून व्यक्तिमत्व विकासासोबत याठिकाणी स्वरक्षणाचे प्रगत शिक्षणही मुलींना दिले जाते. आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी आज गुरुकुल शिक्षण पद्धतीचे मोठे योगदान ठरू शकते हा संदेश या देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आला असून हा देखावा परिसरातील गणेश भक्तांचा आकर्षणाचा विषय ठरला आहे.
खूप सुंदर देखावा आहे, जो आपल्या आजच्या पिढीला खूप गरजेचा आहे . अप्रतिम बाप्पा
Thanks,