रत्नागिरी:- राजकारणात दावा करण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे, तो कोणीही नाकारू शकत नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये भाजपाची ताकद अधिक आहे हेही विसरून चालणार नाही. मात्र जागा कुणाला मिळणार यापेक्षा शत्रूला चिटपट करणं हे आमचे ध्येय असून महायुती म्हणून आम्ही ते नक्की गाठू असं विश्वास भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. https://sindhudurgsamachar.in/kokan-सारस्वत-ब्राम्हण-समाजाच/
रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी लोकसभा मतदार संघातील दावेदारीबद्दल बोलताना ते म्हणाले की राजकारणात कोणीही दावा करू शकतो, त्यात चुकीचे काहीही नाही. मात्र भाजपची ताकद यां मतदार संघात जास्त आहे. 2019 ला मला मिळालेली मते आणि भाजपाच्या मतांची बेरीज सर्वाधिक होते, दीड वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाने चांगल्या जागा मिळवल्या होत्या. भाजपाचे काम उत्तम सुरु आहे, चिपळूणपासून बांद्यापर्यंत भाजपाची ताकद आहे. त्यामुळे ही जागा मागायचा आमचा अधिकार आहे असे ते म्हणाले. पण महायुतीच्या जगवाटपात ते ठरवले जाईल आणि तो निर्णय आम्हाला सर्वाना मान्य असेल. मात्र आम्हाला एकत्र येऊन शत्रूला नेस्तनाबूत करायचे आहे. त्यासाठी आम्ही एकजुटीने काम करणार हा आमचा अजेंडा फिक्स आहे असेही त्यांनी सांगितले