मालवण -: मालवण शहरातील एका सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानातील १५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून पलायन केलेल्या तीन महिलांना देवगड येथे देवगड पोलीसांनी ताब्यात घेतले. संशयित तीनही महिलांना मालवण पोलीस ठाण्यात आणून चौकशीअंती त्यांना अटक करुन मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांचीही वैयक्तिक जामिनावर मुक्तता केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-जिल्हा-परिषद-प्राथमिक-शा/
22 जानेवारी रोजी दुपारी सोमवार पेठ येथील मे. गोपाळ नारायण कारेकर ज्वेलर्स यांच्या दुकानातील 15 हजार रुपये किमतीच्या वाटी आकाराच्या डवल्या तसेच सोन्याचे चार मणी असे 2 ग्रॅम 500 मिली वजनाचे दागिने तीन महिलांनी दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने चोरुन नेले. याबबतची तक्रार महेश गोपाळ कारेकर यांनी मालवण पोलीस स्थानकात दिली होती. त्यानुसार मालवण पोलीसांनी तीन अज्ञात महिलांवर मालवण पोलीस स्थानकात भादवि कलम 380, 84 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
बुधवारी देवगड पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील जाधव यांनी देवगड पोलीसांच्या मदतीने देवगड येथे संशयित तीनही महिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर तीनही महिलांना मालवणात आणल्यानंतर त्यांच्याकडील चोरीचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेऊन महिलांना अटक करण्यात आली. त्यांना मालवण न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची जमिनावर मुक्ताता करण्यात आली आहे.