
सावंतवाडी ता. ०५-: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या कोकण भूमीतच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळावा यासारखे दुर्दैव नाही त्यामुळे छत्रपतींच्या पुतळ्याच्या कामात ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचे वस्त्रहरण आगामी निवडणुकीत केल्याशिवाय गप्प बसू नका असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी सावंतवाडीतील सभेत केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-सावंतवाडी-विधानसभा-मतदा-2/
दरम्यान सावंतवाडीतील जॅकेट वाल्याची जादूगराची जादू फार मोठी आहे. एखादा आजार बरा झाला नाही तर आपण डॉक्टर बदलतो. हॉस्पिटलमध्ये परत परत गेल्यानंतर आजार बरा झाला नाही तर आपण डॉक्टर बदलत असाल तर वारंवार भूमिपूजन होऊन देखील मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तर आता काय बदलायचं हे आता तुम्हीच ठरवा असा टोला ही श्री कोल्हे यांनी मंत्री केसरकर यांना हाणाला.