वेंगुर्ला प्रतिनिधी- मठ येथील राय डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूलमध्ये राष्ट्रीय हरित सेना विभाग व सामाजिक वनीकरण विभाग, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिन व चिमणी दिन साजरा करण्यात आला. यावेळी मानवी जीवनात वने व चिमण्या यांच्या असलेल्या महत्त्वाच्या स्थानाबाबत विद्यार्थ्यांना चित्रफित दाखविण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-उभादांडा-येथील-गणपतीचे-व/
दरम्यान, आठवी ते नववीच्या मुलांसाठी घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत सिद्धी सावंत (प्रथम), रश्मी भगत (द्वितीय) व हसरी होडावडेकर (तृतीय) तर सोहम गावडे व विठ्ठल गावडे (उत्तेजनार्थ) यांनी क्रमांक पटकाविले. या सर्वांना सामाजिक वनिकरण विभागाचे बापू डोईफोडे यांच्या हस्ते रोख रक्कमेची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एस.ए.जाधव, राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या प्रमुख एस.बी.कांबळी, शिक्षक जी.एम.गोसावी, ए.पी.वाढोकर, एन.बी.नाईक, डी.पी.मोबारकर यांच्यासह कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटोओळी-वने व चिमण्या यांच्या असलेल्या महत्त्वाच्या स्थानाबाबत विद्यार्थ्यांना चित्रफित दाखविण्यात आली.