🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l सिंधुदुर्ग, दि- ०१:-
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंदे जिल्ह्यात खपवून घेणार नाही असा इशारा दिल्यानंतर बहुतांशी खुलेआम चालणारे अवैध धंदे बंद झालेत मात्र सोशल क्लब च्या गोंडस नावाखाली चा जुगार मात्र पोलिसांच्या सहकार्याने राजरोसपणे सुरु असल्याची लेखी तक्रार पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या कडे करण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-रेल्वेचे-आजपासून-नवीन-न/
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोशल क्लबच्या नावाखाली या तक्रारीत नमुद केलेल्या सर्व सोशल क्लबमध्ये संबंधीत पोलीस स्टेशन व स्थानिक अन्वेषण विभागाच्या संबंधीत अधिका-यांच्या सक्रिय सहकार्याने, सहभागाने व वरदहस्ताखाली सोशल बलब या गोंडस नावाखाली, रमी, अंदर बाहर व फ्लश (तीन पत्ती) हे जुगार चालवित आहेत व त्याकरीता मे. सहाय्यक धर्मदाय आयुक्त, सिंधुदुर्ग ओरोस, ता. कुडाळ यांचेकडील सोशल क्लबच्या नावाखाली नोंदणी केलेल्या नोंदणीप्रमाणपत्राचा गैरवापर करीत आहेत.खालो नमुद जुगाराच्या अड्ड्यांवर प्रति पॉइंट रुपये २०/- (रुपये वीस मात्र) या दराने पैसे लावून जुगार खेळत असतात व सदरच्या बेकायदेशीर व अनधिकृत जुगार अड्ड्यावर दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते व सदरहू सोशल क्लयमध्ये जुगार खेळणेकरीता केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे, तर परराज्यातील व गोवा राज्यातील देखील उत्साही जुगारी सहभागी होत असतात व काउंटर देवाणघेवाणीसाठी वापरले जातात. तसेच केवळ पोलीसांना फसविणेकरीता कॅरम व बुध्दीबळासारखे खेळ खेळले जातात असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सोशल क्लब ची नोंदणी करुन राजरोसपणे चालणाऱ्या या जुगार व्यवसायामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत….