Kokan: जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर मध्ये होणाऱ्या गैरप्रकाराबाबत निवेदनाद्वारे वेधले लक्ष

0
47
व्हिडिओ गेम पार्लर ,
जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर मध्ये होणाऱ्या गैरप्रकाराबाबत निवेदनाद्वारे वेधले लक्ष

⭐शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.संजय आंग्रे,शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सरंबळ गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी,जिल्हा अधिक्षक यांची घेतली भेट

ओरोस – शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.संजय आंग्रे,शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सरंबळ गावातील ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेतली. जिल्ह्यात व्हिडिओ गेम पार्लर मध्ये होत असलेल्या गैरप्रकाराबाबत लक्ष वेधले.

व्हिडिओ गेम पार्लर विरंगुळा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय उपचिटणीस शाखा यांच्याकडून अटी शर्तीच्या आधारावर दिली जाते. परंतु या दिलेल्या अटी शर्तीचे पालन न करता मोठ्या प्रमाणावर लुटमार होत आहे. याचा तरुणाईला मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात. परंतु त्याचा भ्रम निरास होऊन ते आत्महत्ये सारखे पाऊल उचलतात. तरी यावर प्रतिबंध घालावेत अशी मागणी केली.

यावर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी यावर आपण योग्य ती कारवाई करू.परंतु आपण देखील या गेम कडे आकर्षित होऊ नये यावर तरुणांचे प्रबोधन करावे असा सल्ला दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here