Kokan: जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट संशोधन महाविद्यालय म्हणून कुडाळ महाविद्यालयाला बहुमान

0
56
संत राऊळ महाराज महाविद्यालय,
संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या संशोधन प्रकलल्पांची आविष्कार अंतिम स्पर्धेसाठी निवड

संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या संशोधन प्रकलल्पांची आविष्कार अंतिम स्पर्धेसाठी निवड:

कुडाळ- संत राऊळ महाराज महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठ आयोजित अविष्कार संशोधन स्पर्धेत भरीव यश मिळविले आहे. मुंबई विद्यापीठ आयोजित शैक्षणिक वर्ष २३-२४ साठीच्या आविष्कार स्पर्धेत ,संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एकूण २१ विद्यार्थ्यांनी ०९ रिसर्च प्रोजेक्टचे सादरीकरण केले.पैकी एकूण ०५ प्रकल्पांची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांची प्राथमिक निवड स्पर्धा कणकवली कॉलेज ,कणकवली येथे नुकतीच संपन्न झाली .दरवर्षी मुंबई विद्यापीठ आविष्कार स्पर्धा आयोजित करते .महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक आवड निर्माण व्हावी व कौशल्य विकसित व्हावीत आणि त्यांच्या संशोधनाला समाजात वाव मिळावा ,संधी मिळावी हा या स्पर्धेचा सकारात्मक हेतू आहे.या प्रसंगी २०२२-२३ च्या स्पर्धेमधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट संशोधन महाविद्यालय म्हणून कुडाळ महाविद्यालयाला गौरविण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/kokan-चोराच्या-मनात-चांदणे-जमी/

तेजस हनुमंत सावंत ,प्रवीण सावंत ,प्रथमेश दळवी,मंदार कोरगावकर,शुभम घोलम,कल्पज फनसळकर,विनय तिवरेकर,समृद्धी मोडक,दर्पण मेस्त्री या विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहे प्रकल्प अहवालांची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.महाविद्यालयाच्या संशोधन समितीचे समन्वयक प्रा.डॉ.पी.डी.जमदाडे, प्रा.डॉ.के.एम.चव्हाण प्रा.एन.आर.काळे,प्रा.एस.आर.चौगुले, प्रा.पी.एम.तेंडुलकर तसेच डॉ.वाय.जे.कोळी आदींचे मार्गदर्शन लाभले.क.म.शि.प्र. मंडळाचे संस्थापदाधिकारी,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ए.एन.लोखंडे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदी सर्वांकडून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here