Kokan: ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मुदत ठेवीवर ८.८५ टक्के व्याज दर

0
33
ज्येष्ठ नागरिका
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मुदत ठेवीवर ८.८५ टक्के व्याज दर

सिंधुदुर्ग , 9 एप्रिल, २०२४ : भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना आजवर अमलात आणल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव योजनेच्या माध्यमातून ८.८५ टक्के इतका व्याजदर मिळणार आहे. बजाज फायनान्स लिमिटेड तर्फे याबाबत आज घोषणा केली असून ज्येष्ठ नागरिकांसह अन्य वयोगटातील व्यक्तींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.  https://sindhudurgsamachar.in/kokan-मंत्री-दिपक-केसरकर-यांचा/

बजाज फायनान्सच्या मुदत ठेवी आणि गुंतवणूक विभागाचे प्रमुख सचिन सिक्का म्हणाले, “स्थिरता शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ठेवींच्या अनेक गुंतवणूक प्रकारांत व्याजदर वाढवत आम्ही आकर्षक प्रस्ताव सादर केलेले आहेत. गेली अनेक वर्ष लाखो ठेवीदारांनी बजाज ब्रॅण्डवर त्यांचा दृढ विश्वास कायम ठेवलेला आहे. त्यांना उत्तम अनुभव प्रदान करत राहणे, अधिक मूल्य सादर करणे आणि गुंतवणूकीसाठी सुरक्षित असा पर्याय देणे यावर आमचे लक्ष सतत केंद्रीत राहणार आहे.”

कंपनीने ज्येष्ठ नागरिकांसाठी २५ ते ३५ महिन्यांच्या कालावधीतील मुदत ठेवींच्या व्याजदरात ६० अंशांपर्यंत (०.६ टक्क्यांपर्यंत) वाढ केली आहे. तर १८ ते २४ महिन्यांच्या कालावधीसाठी व्याजदरात ४० अंशांपर्यंत (०.४ टक्क्यांपर्यंत) वाढ केली आहे. ही दरवाढ ३ एप्रिल २०२४ पासून अंमलात आली आहे.

बिगर ज्येष्ठ नागरिकांसाठी, २५ ते ३५ महिन्यांच्या कालावधीतील ठेवींसाठी व्याजदर ४५ अंशांपर्यंत (०.४५ टक्क्यांपर्यत) वाढवण्यात आले आहेत. तर १८ आणि २२ महिन्याच्या कालावधीसाठी व्याजदर ४० अंशाने (०.०४० टक्क्यांनी)  तर ३० आणि ३३ महिन्याच्या कालावधीसाठी ३५अंशांनी (०.३५ टक्क्यांनी) व्याजदर वाढवण्यात आले आहेत.
कंपनीचे हे पाऊल बाजारातील सध्याच्या परिस्थितीत स्थिर आणि उत्तम परतावा मिळवण्याची संधी बचत करणाऱ्या व्यक्तींना देत आहे.

ज्येष्ठ नागरिक त्याच्या डिजिटल मुदत ठेवींसाठी ८.८५ टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळवू शकतात, तर बिगर ज्येष्ठ नागरिक ४२ महिन्यांच्या कालावधीसाठी डिजीटल मुदत ठेव योजनांकरिता ८.६० टक्क्यांपर्यंत व्याजदरांचा लाभ घेऊ शकतात.

——————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here