वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड व आभाकार्ड नोंदणीकरीता वेंगुर्ला नगरपरिषद, ज्येष्ठ नागरिक संघटना, वेंगुर्ला तालुका पेन्शनर्स असोसिएशन व आधार फाऊंडेशन सिधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नोंदणी कॅम्प आयोजित केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-संजय-मालवणकर-स्मृती-शिक्/
दि.१५ फेब्रुवारी रोजी सायं. ४ ते ५ वेळेत दाभोसवाडा शाळा, १६ रोजी सायं. ४ ते ५ वेळेत वेंगुर्ला शाळा नं.१, १७ रोजी सायं. ४ ते ५ वेळेत वेंगुर्ला नं.३, २० रोजी सायं.४ ते वेळेत भटवाडी नं.२, २१ रोजी सायं.४ ते ५ वेळेत शिवाजी प्रागतिक शाळा, २२ रोजी सायं. ४ ते ५ वेळेत वेंगुर्ला शाळा नं.४, २३ रोजी सायं.४ ते ५ वेळेत उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय येथे नोंदणी कॅम्प होणार आहे. तरी शहरातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरीकांनी आपल्या जवळच्या परिसरातील नोंदणी कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.