सिंधुदुर्गनगरी ता.१६: डाक सप्ताहात जीवन विमा योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. ग्रामीण भागातील जनतेला जीवन विम्याचे व बचतीचे महत्व कळावे यासाठी “डाक-चावडीच्या” माध्यमातून या योजेनांची माहिती देण्यात आली. या सप्ताहात डाक जीवन विम्याचे एकूण २१९ नवीन प्रस्ताव झाले असून ३१ लाख ५२ हजार १५२ रुपये इतका नवीन प्रीमियम जमा करून ५ कोटी २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण प्रदान करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा डाक विभागाचे अधीक्षक मयुरेश कोले यांनी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/kokan-उड्डाणपूल-कोसळणं-ही-दुर्/
भारतीय डाक विभागातर्फे ९ आक्टोबर ते १३ आक्टोबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या अनुषंगाने डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व बचत योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी वेगवेगळे दिवस साजरे करण्यात आले. या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करण्यासाठी डाक विभागामार्फत प्रयत्न करण्यात आले. याची माहिती देण्यासाठी आपल्या कार्यालयात डाक अधीक्षक कोले यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी विकास अधिकारी बालाजी मुंडे, कार्यालय सहाय्यक योगेश फुले उपस्थित होते.