Kokan: डीगस गावातील प्रगतिशील शेतकरी श्री नामदेव वामन चोरगे यांना पुष्पसेन सावंत कृषी मित्र पुरस्कार प्रदान!

0
83
पुष्पसेन सावंत कृषी मित्र पुरस्कार प्रदान!
डीगस गावातील प्रगतिशील शेतकरी श्री नामदेव वामन चोरगे यांना पुष्पसेन सावंत कृषी मित्र पुरस्कार प्रदान!

अॅड सुहास सावंत, शिवसेना नेते अतुल बंगे, संस्था अध्यक्ष अमरसेन सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान !

कुडाळ (प्रतिनिधी)- पुष्पसेन सावंत लोक प्रतिनिधी म्हणून खरी समाजाची सेवा केली. मात्र त्यांच्यामधला खरा खुरा रांगडा शेतकरी सतत शेतीमध्ये राबतांना दिसायचा. पुष्पसेन सावंत यांचा सुपुत्र अमरसेन सावंत, भुपसेन सावंत यांनी कृषी मित्र ही संकल्पना वडीलांच्या स्मृती दिनानिमित्त मांडली . त्यांच्या आठवणींना उजाळा म्हणून आज कृषी मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला असे प्रतिपादन प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ तथा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड सुहास सावंत यांनी केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-खाजगी-फायनान्स-कंपनीकडू/

कालिका प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ डीगस माजी अध्यक्ष कै. पुष्पसेन सावंत यांच्या चतुर्थ स्मृती दिनाचे औचित्य साधून पुष्पसेन सावंत कृषी मित्र पुरस्कार श्री. नामदेव चोरगे या प्रगतीशील शेतकऱ्यांना अॅड श्री सावं व श्री बंगे, यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी रंगभरण स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती त्यांचा बक्षीस वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अॅड सुहास सावंत, शिवसेना नेते अतुल बंगे, संस्था अध्यक्ष श्री.अमरसेन सावंत, डीगस सरपंच सौ पुनम पवार,माजी उपसरपंच बाळा पवार,माजी उपसभापती शिवाजी घोगळे, संचालक रामचंद्र घोगळे, पत्रकार गुरुप्रसाद दळवी, पत्रकार रवि गावडे, माजी मुख्याध्यापक श्री दीपक आळवे,सहा शिक्षक संजय वेतुरेकर, प्रभारी मुख्याध्यापक सौ अनुजा सावंत,शिक्षक रमेश कांबळे,उदय घोगळे,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here