🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार -वेंगुर्ला/ प्रतिनिधी-
जिल्हापरिषद सिधुदुर्ग व पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने ५२वे वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १० व बुधवार दि. ११ डिसेंबर या कालावधीत वेंगुर्ला हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते १० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
उद्घाटनप्रसंगी गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.गणपती कमळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिपी, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, शिक्षणाधिकारी निलिमा नाईक, कोल्हापूर चर्च कौन्सिलचे सेक्रेटरी दिनानाथ कदम, चेअरमन डी.डी.धनवडे आदी उपस्थित रहाणार आहेत. दि.१० रोजी सकाळी १० वा. विज्ञान प्रदर्शन प्रतिकृती सहभाग नोंदणी, प्रदर्शन साहित्य मांडणी, लहान व मोठ्या गटात निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, लहान गटात प्रश्नमंजूषा, दि.११ रोजी सकाळी १० वा. मोठ्या गटात प्रश्न मंजूषा स्पर्धा आणि प्रतिकृती परिक्षण, दुपारी २ वा. गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण व समारोप होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-ग्रंथदिडीने-साहित्य-संम/
तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी आणि वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे यांनी विस्तार अधिकारी (शिक्षण), सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, तालुका शिक्षक संघटनेचे सर्व प्रतिनिधी, वेंगुर्ला हायस्कूल आणि पंचायत समिती शिक्षण विभाग कर्मचारी यांच्यावतीने केले आहे.