Kokan: तुळस येथे आयोजित २४ व्या रक्तदान शिबिरात ४३ जणांचे रक्तदान

0
64
रक्तदान,
तुळस येथे आयोजित २४ व्या रक्तदान शिबिरात ४३ जणांचे रक्तदान

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ तुळस तसेच सावंतवाडी रक्तपेढीच्या सहकार्याने श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस येथे आयोजित केलेल्या सलग २४ व्या रक्तदान शिबिरात ४३ दात्यांनी रक्तदान केले. उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संदीप पेडणेकर व सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते झाले. सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-कॅम्प-घोडेबां/

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या शिंगारे, मानसी बागेवडी, विवेक तिरोडकर, प्रा.डॉ.सचिन परुळकर, सुजाता पडवळ, महेश राऊळ, सद्गुरू श्री स्वामी समर्थ मठचे मिलिंद शेटकर, तुळस पोस्ट मास्तर दिलीप वेंगुर्लेकर, प्राजक्ता रेडकर, अनिल खाडे, प्रा.जी.पी.धुरी आदी उपस्थित होते.  शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सागर सावंत, माधव तुळसकर, सद्गुरू सावंत, मंगेश सावंत, प्रदीप परूळकर, राजू परूळकर, प्रसाद भणगे, विधी नाईक, वैष्णवी परूळकर, जान्हवी सावंत, हेमलता राऊळ, प्रतिक परूळकर, प्राची गोरे, भूमी परूळकर यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन  गुरुदास तिरोडकर व आभार किरण राऊळ यांनी मानले.

फोटोओळी – सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here