वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा-बागायत येथील रहिवासी, पिराचा दर्गा येथील जुने दुकानदार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दाजी तुळसकर (९०) यांचे २७ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते हौशी नाट्यकर्मी म्हणून परिचित होते. हौशी नाट्य मंडळातर्फे सादर होणाया सामाजिक व ऐतिहासिक नाटकात त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. खादी ग्रामोद्योग मंडळाचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पाचवी-आठवीच्या-तीन-विषय/
त्यांच्या पश्चात ३ मुलगे, १ मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. स्टेटबँकेचे कर्मचारी विनोद, उभादांडा ग्रा.पं.चे माजी सदस्य ज्ञानदेव व पिराचा दर्गा येथील दुकानदार प्रमोद तुळसकर यांचे ते वडील होत.
फोटो – दाजी तुळसकर