दापोली- देशात सर्वत्र लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने ठिकठिकाणी मतदान जनजागृती अभियान सुरु केले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आल्याने आता उर्वरित टप्प्यांत हा टक्का वाढावा यासाठी ठिकठिकाणी प्रशासकीय यंत्रणेमार्फत मतदार जागृती अभियानांचे आयोजन करण्यात येत आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-विधान-परिषदेचे-लॉलीपॉप/(opens in a new tab)
दापोलीतही प्रांताधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, ‘स्वीप’ उपक्रमाचे नोडल ऑफिसर तथा गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, नायब तहसीलदार अमित आडमुठे, सहायक नोडल ऑफिसर बळीराम राठोड, धनंजय शिरसाटआदींच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती शिक्षण विभागाचे मतदार जनजागृती कलापथक स्थापन करण्यात आले असून हे पथक दापोली तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात ठिकठिकाणी जाऊन पथनाट्याद्वारे मतदारांची जागृती करीत आहे.
बाबू घाडीगांवकर, महेश गिम्हवणेकर, गणेश तांबिटकर, संजय मेहता, संतोष सकपाळ, उदय गांधी, सुनंदा मळगे, संजीवनी लाडे, वैजन देवघरकर, विजय भारदे, शशिकांत बैकर, महेश शिंदे, राहुल राठोड, उजेर शेख आदी शिक्षक पोवाडा, नाटीका, गीतगायनाच्या माध्यमातून ही मतदार जागृती करीत आहेत. कलापथकाच्या सादरीकरणाचा दापोली तालुक्यात सकारात्मक प्रतिसाद दिसत असून ठिकठिकाणी या कलापथकाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे.