रत्नागिरी- पूर्वीची दादर-रत्नागिरी आणि सध्याची दिवा-रत्नागिरी पॅसेंजर आता लवकरच नव्या रंगरूपात धावताना दिसणार आहे. देखभाल दुरुस्तीसह वेगवर्धन, सेक्शनमध्ये लवकर क्लिअरन्स मिळणे अशाच फीचर्ससह येणारी ही मेमू प्रकारातील गाडी असेल. मात्र, आसन क्षमता घटणार असल्यामुळे कोकणवासीयांसाठी ही गाडी गैरसोयीची ठरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-भूतनाथ-जत्रौत्सव-५-रोजी/
कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाल्यापासून धावत असलेली कोकणवासीयांना उपयुक्त ठरणारी पूर्वीची दादर रत्नागिरी पॅसेंजर कोरोना काळापासून दिवा- रत्नागिरी पॅसेंजर झाली आहे. दोन वर्षांपूर्वीच पूर्वीच्या निळ्या पांढऱ्या रंगसंगतीमधील जुन्या गाडी ऐवजी लाल रंगातील एलएचबी श्रेणीमधील दीनदयाळ प्रकारच्या कोचसह धावत आहे. मात्र, आता ही गाडी आणखी नव्या रंगरूपात धावताना दिसणार आहे.