🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l नवी मुंबई l 07 जानेवारी
देवगडमधील वाघोटन गावातून ५ डझन केशर आंब्याची पहिली पेटी बाजार समितीमध्ये दाखल झाली. १६ हजार रुपये दराने पेटीची विक्री झाली. तर एका आंब्याला २६६ रुपये विक्रमी दर मिळाला. https://sindhudurgsamachar.in/kokan-कामाचा-कोणताच-अनुभव-नसले/
देवगडमधील शकील मुल्ला यांनी सोमवारी पाच डझन केशर आंबा विक्रीसाठी बाजार समितीमध्ये पाठविला आहे. मुहूर्ताचा आंबा खरेदीसाठी ग्राहकांनीही गर्दी केली होती. अखेर १६ हजार रुपये दराने पेटीची विक्री झाली. ३,२०० रुपये डझन असा दर मिळाला असून, एका आंब्याला २६६ रुपये मोजावे लागले आहेत. या वर्षी आंबा हंगामाला उशीर झाला आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून नियमित आवक सुरू होणार आहे.
या वर्षी दक्षिण आफ्रिकेचा मलावी हापूस व इतर दोन प्रकारचे आंबे विक्रीला आले होते. आज मंगळवारी अजूनही एक प्रकारचा आंबा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.