Kokan: निकालाची उज्ज्वल परंपरा कौतुकास्पद – विनायक कारभाटकर

0
30
निकालाची उज्ज्वल परंपरा कौतुकास्पद - विनायक कारभाटकर

वेंगुर्ला प्रतिनिधी – सत्य, प्रामाणिक निष्ठा व कठर मेहनतीने मिळविलेले यश हे सर्वोत्तम यश असून ते जीवनात अखंड टिकते. सद्विचार, सदाचार व सद्गुण ही आपल्या जीवनात उर्जेसारखे कार्य करून आपल्याला उन्नत्तीसाठी यश व समाधान देतात. ग्रामीण भागातील शाळेची दहावीतील १०० टक्के निकालाची उज्वल परंपरा आणि विद्यार्थ्यांनी मिळविलेले सर्वोत्तम गुण कौतुकासपद व अभिनंदनीय आहेत असे गौरवोद्गार उद्योजक विनायक कारभाटकर यांनी काढले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-विधीमंडळ-अधिवेशनात-संप/

 अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थेच्यावतीने अणसूर पाल हायस्कूलमधील एसएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शाळेच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे मया-गोवा येथील उद्योजक विनायक कारभाटकर, संस्था अध्यक्ष आत्माराम गावडे, सेक्रेटरी लिलाधर गावडे, शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, सदस्य दिपक गावडे, देवू गावडे, विजय गावडे, गुंडू गावडे, भाऊ गावडे, सरपंच सत्यविजय गावडे, पाल सरपंच कावेरी गावडे, जनशिक्षण संस्थेचे गजानन गावडे, माजी मुख्याध्यापक शैलजा वेटे, सेवानिवृत्त लिपिक सुधीर पालकर व रूचिरा पालकर, वासुदेव बर्वे, नारायण ताम्हणकर, बिटू गावडे, अनंत मांजरेकर, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

      आत्माराम गावडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन भावी जीवनात आपल्या आवडत्या क्षेत्रात सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले. लिलाधर गावडे यांनी शैक्षणिक विकासासाठी संस्था करीत असलेल्या प्रयत्नांत सर्व माजी विद्यार्थीपालक व ग्रामस्थ यांच्या भरीव सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. एम.जी.मातोंडकर यांनी सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी नेहमी तत्पर रहावे व आपला विकास साधण्यासाठी मेहनत घ्यावी असे प्रतिपादन केले. यावेळी सरपंच सत्यविजय गावडेसरपंच कावेरी गावडेभाऊ गावडेगुंडू गावडे यांनीही विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

      अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थेच्यावतीने वेंगुर्ला तालुक्यात आठवा आलेल्या व शाळेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या मंदार बापू नाईकद्वितीय यज्ञेश भास्कर गावडे व तृतीय भुमिका अनंत राऊळ यांचा सॅकबॅगफोल्डर  तर विशेष श्रेणीतील १९प्रथम श्रेणीतील ११ व द्वितीय श्रेणीतील २ मिळून एकूण ३२ ही विद्यार्थ्यांना पेनसेट देऊन गौरव केला. संस्थेच्यावतीने सर्व शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जीवन विद्या मिशन पुस्तिका भेट दिली. सेवानिवृत्त लिपिक सुधीर पालकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेच्यावतीने शालश्रीफळसन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्यावतीने बुद्धमूर्ती व साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली.सुधीर पालकर यांनी संस्था व शालेय परिवाराचे आभार मानूनसंस्थेला पंचवीस हजारचा रूपयांचा धनादेश दिला तर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वॉटरबॉटल भेट दिली.

      प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनीसुत्रसंचालन  विजय ठाकरगुणगौरव अहवाल वाचन चारुता परब व आभार अक्षता पेडणेकर यांनी मानले.

फोटोओळी – वेंगुर्ला तालुक्यात आठवा व मराठी विषयात प्रथम आलेल्या मंदार नाईक व पालक बापू नाईक यांचा अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थेच्यावतीने सत्कार करताना करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here