⭐कुडाळच्या चिमणी पाखर संस्थेचं आयोजन
कुडाळ/ प्रतिनिधी-
शोध नव्या नृत्य कलाकारांचा या टॅग लाईन खाली शासनमान्य संस्था चिमणी पाखरं आयोजित सिंधुदुर्ग डान्सिंग सुपर स्टार स्पर्धेमध्ये निधी केळुसकर आणि अर्शीन शेख या संयुक्तरित्या विजेत्या ठरल्या आहेत. कुडाळच्या मराठा समाज सभागृहात गेले अनेक आठवडे सुरु असलेल्या या स्पर्धेची रविवारी सांगता झाली. रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी होती. याच उदघाटन सुप्रसिद्ध उद्योजक अनंतरराज पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि पाटकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या दीप प्रज्वलन करून आणि नटराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झालं. यावेळी अनंतराज पाटकर, रोहन तांडेल, उमेश वेंगुर्लेकर, राहुल कदम, संजय कोरगावकर, प्रमोद नाईक, सौ. मुळ्ये, नागेश नेमळेकर, विजय सावंत, संजना परब, श्री .शेख, रवी कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा आणि चिमणी पाखर संस्थेच्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. त्यांनतर मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली यंदाचं हे स्पर्धेचं पाचवं वर्ष होत. सुमारे ६० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. लहान, मध्यम आणि मोठा अशा तीन गटात हि स्पृर्धा घेण्यात आली. यामध्ये परीक्षक म्हणून चिमणी पाखर संस्थेचे संचालक रवी कुडाळकर, दीक्षा नाईक, संजना पवार,अभिषेक चव्हाण, निखिल कुडाळकर यांनी काम पाहिलं. सर्वच स्पर्धकांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केली.https://sindhudurgsamachar.in/kokan-रत्नागिरी-जिल्हा-मध्यवर/
सायंकाळी उशिरा हि स्पर्धा संपली त्यांनतर मान्यवरांच्या उपास्थितीत निकालजाहीर करण्यात आला. लहान गटातून प्रथम क्रमांक – स्फूर्ती खांबले, द्वितीय क्रमांक – अदिती परब आणि ऋचा परब, तृतीय क्रमांक – स्वराली हरम आणि मंत्रा कोळंबकर यांनी मिळविला तर आराध्या मळेकर, लावण्या राऊळ, श्लोक जंगम आणि रिद्धी नार्वेकर याना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं. माध्यम गटातून प्रथम क्रमांक – हेमांगी जाधव, द्वितीय क्रमांक- सई राऊळ / सान्वी मोरजकर, तृतीय क्रमांक – चैत्रा चव्हाण आणि रुता मार्गी यांनी पटकावला तर उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन निधी नाईक, तन्वी परब, जान्हवी पावसकर यान गौरविण्यात आलं. मोठ्या गटातुन प्रथम -प्राची पाटकर, द्वितीय-युक्ती हळदणकर आणि पियुषा पेडणेकर, तृतीय-निविदा चौगुले आणि प्राची जाधव यांनी पटकावला तर उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन लोकेश अणावकर, यशस्वी शेलटे, चिन्मयी सावंत यान सन्मानित करण्यात आलं. त्यांनतर रवी कुडाळकर यांनी डान्सिंग सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टारची घोषणा केली. निधी केळुसकर आणि अर्शीन शेख या संयुक्त विजेत्या ठरल्या. सर्व विजेत्यांना, रोख रक्कम, आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक निलेश गुरव, शुभम धुरी, नागेश नेमळेकर आणि राहुल कदम यांनी केलं. कार्यक्रमाला सँर्धक, पालक, रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.