Kokan: निवती मेढा ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर सानिया सखाराम रावले यांची नगर रचना विभाग मुंबई येथे नियुक्ती

0
31
निवती मेढा ग्रामपंचायतडाटा ऑपरेटर सानिया सखाराम रावले
निवती मेढा ग्रामपंचायतडाटा ऑपरेटर सानिया सखाराम रावले यांची नगर रचना विभाग मुंबई येथे नियुक्ती

म्हापण/ संदीप चवहाण-:निवती मेढा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यरत असलेल्या डाटा ऑपरेटर सानिया सखाराम रावले यांची नगर रचना विभाग मुंबई येथे कर्मचारी म्हणून नियुक्ती झाल्याने ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/kokan-राष्ट्रीय-लोकअदालतीमध्-2/

यावेळी बोलताना सरपंच अवधूत रेगे यांनी त्यांचे भरपूर कौतुक केले. ग्रामपंचायत निवती मेढा येथे डाटा म्हणून काम करताना सानिया हि आपले काम प्रामाणिकपणे तसेच कोणतेही काम करताना मन लावून काम करायची त्यामुळे तिची उणिव आम्हाला कायम भासेल .परंतु आपल्या ग्रामपंचायत मध्ये डाटा ऑपरेटर म्हणून काम करणारी मुलगी मुंबई येथे एका सेवेत दाखल झाल्याने आपल्या सार्थ अभिमान असल्याचेही सांगत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार कार्यक्रम वेळी जिल्हा परिषद विस्तार अधिकारी शिंगाडे, निवती मेढा ग्रामपंचायत सरपंच अवधूत रेगे, उपसरपंच गोविंद जाधव, प्रेमचंद कोचरेकर,डि.टी.मेतर, तुळशीदास मेतर, निवृत्त शिक्षक तसेच श्रीरामवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष निवतकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here