सिंधुदुर्ग- सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तरी सर्व युध्द विधवा, माजी सैनिक विधवा, माजी सैनिक व माजी सैनिक अनाथ पाल्य तसेच शिल्लक राहिलेल्या जागासाठी नागरी पाल्य यांनी दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करुन घ्यावा असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशांनुसार विविध स्तरावर शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यास अनुसरुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांचे अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतिगृह सावंतवाडी येथे प्रवेशाकरिता आकारण्यात येणारी दर पुढीलप्रमाणे आहेत. सैनिकी मुलांचे वसतिगृह,सावंतवाडी येथे प्रवेश क्षमता 60 एवढी आहे.
दर प्रतिमाह माजी अधिकारी, ऑनररी अधिकारी पाल्य रुपये 900, माजी जेसीओज पाल्य रुपये 800, माजी एनसीओज, शिपाई रुपये 600, नागरी पाल्य रुपये 2250 आहे. युध्द विधवा, इतर माजी सैनिक विधवा यांचे सर्व पाल्यांना तसेच माजी सैनिकांच्या अनाथ पाल्यांना वसतिगृह प्रवेश मोफत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयतील 02363272312, 9545287331 वर संपर्क साधावा