रत्नागिरी- शेती व्यवसाय करताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात अथवा वाहन अपघातात शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे .https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-पिरेम-चित्रपटा/
शेती व्यवसाय करताना अनेकदा अपघात होतात . जसे की वीज पडणे , पूर , सर्पदंश , विंचूदंश , विजेचा धक्का बसणे , पाण्यात बूडून मृत्यू होणे , नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात , वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते . घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते . त्यामुळे राज्य सरकार गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जात आहे . या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना दोन लाखांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे