Kokan: पर्यावरणात पर्वतांना अनन्यसाधारण महत्त्व –  डॉ. संजिव लिगवत

0
85
पर्यावरण,गिर्यारोहण संघटन,
पर्यावरणात पर्वतांना अनन्यसाधारण महत्त्व - डॉ. संजिव लिगवत

वेंगुर्ला प्रतिनिधी- पावसाच्या वाटणीसाठी पर्वतांचे महत्त्व असून गुरेढोरे, मेंढ्या चरण्यासाठी, वृक्ष, मौल्यवान लाकडे, उपयुक्त रसायने, औषधी द्रव्ये पर्वतावर मिळतात. विशिष्ट पर्वतावर चहा कॉफी लागवड होतेच, पर्वतावरून येणा-या जलप्रवाहावर विद्युत निर्मिती होते, रोजच्या  धावपळीच्या जीवनात पर्वत हौशी पर्यटकांना अलिप्तता, शांतता देतो व पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी पर्वतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्या गिर्यारोहण संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत यांनी केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-मठ-केंद्रशाळेच्या-शतक-मह/

अणसूर पाल हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब, जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत, मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षिका अक्षता पेडणेकर, चारूता परब, वैभव परब उपस्थित होते. यावेळी डॉ. लिगवत यांनी पर्वतांचे प्रकार, महत्त्व विषद करुन किल्ले संवर्धन व पर्यटन या विषयावर सविस्तर विवेचन केले.

या कार्यक्रमात किल्ले संवर्धन व संरक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल यशवंत गड शिवप्रेमी संघटनेचे सागर नाणोसकर व साईश गोडकर यांचा शाल, श्रीफळ व गडकिल्ले पुस्तक देऊन सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना, जनसेवा प्रतिष्ठान व अर्चना घारे परब फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने अर्चना घारे परब व अणसूर पाल हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय ठाकर यांनी तर आभार योगेश कुबल यांनी मानले.

फोटोओळी – पर्वत दिन कार्यक्रमात सागर नाणोसकर व साईश गोडकर यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here