कुडाळ:-शिवसेना (ठाकरे गट) आमदार वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा कुडाळ पावशी गावातील नळपाणी योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार वैभव नाईक यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडावेळा तणावाचे वातावरण होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-कित्येकवर्षे-आंधारात-चा/
कुडाळ येथील पावशी गावातील नळपाणी योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार वैभव नाईक यांना धक्काबुक्की झाली. यावेळी शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.त्यानंतर थोडी धक्काबुक्कीही झाली.उपस्थित लोकांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.आपल्या मतदारसंघातील नळपाणी योजनेच्या भुमिपुजनासाठी गेलेल्या आमदार वैभव नाईक यांना भाजप कार्यकर्त्यांकडून रोखण्याचा प्रयत्न झाला. युवा मोर्चाचे पदाधीकारी व कट्टर राणे समर्थक असलेले पप्या तवटे आमदार वैभव नाईक यांच्या अंगावर धावून गेले.मात्र, वैभव नाईक यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी रोखले यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
आमदार वैभव नाईक गेल्या काही दिवसांपासून कोकणातलं राजकारण चांगलंच तापवत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडतअसल्याने विरोधककांकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप तसेच किंवा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांची अटक यावरुन कोकणात जोरदार राजकारण सुरु आहे. अशातच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांवर निशाणा साधला असून. ईडीच्या कारवाई नंतर नाईक यांनी नितेश राणे यांच्यावर टीका करने चालूच ठेवले आहे.
दोन महिन्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रिपद जाणार असल्याचा गौप्यस्फोट कुडाळ मालवण आमदार वैभव नाईक यांनी केला होता. आतापर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरवणाऱ्या राणे यांचे राजकीय अस्तित्व भाजप ठवरणार आहे.भाजपला आता राणेंची राजकीय दृष्ट्या गरज नसल्याने त्यांना आता पदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे सांगत वैभव नाईक यांनी राणेंना डिवचलं होतं. त्याळे सिंधुदुर्गात राजकिय वातावरण तापलय. दैनिक सिंधुदुर्ग समाचार