Kokan: पिंगुळीत नव्याने सुरू केलेल्या दोन्ही थांब्यावर प्रवासी निवाराशेडची गरज

0
19
दोन्ही थांब्यावर प्रवासी निवाराशेडची गरज
पिंगुळीत नव्याने सुरू केलेल्या दोन्ही थांब्यावर प्रवासी निवाराशेडची गरज

कुडाळ -मनोज देसाई
पिंगुळी-कुडाळ-वेंगुर्ले या रहदारीच्या मुख्य रस्त्यावरील पिंगुळी तिट्ठा हा नेहमीच गजबजलेला असतो. येथे पाच रस्त्यांचा तिट्ठा आहे. सदर रस्त्यावरील एस.टी.बस थांबे वडाखाली गणपती मंदिर येथे असल्याने, वाहतूक कोंडी होऊन वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. याचा विचार करून पिंगुळी ग्राम पंचायतीने एस.टी.प्रवाशांसाठी कुडाळच्या बाजुने विजयालक्ष्मी गारमेंटच्या समोर,तर वेंगुर्लेच्या बाजुने डॉ. राणेंच्या क्लिनीक समोर बस थांब्याची व्यवस्था केली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-राष्ट्रीय-स्वयंसवेक-संघ/

सदर स्तृत्य निर्णयामुळे, पिंगुळी तिट्ठया वरील वाहतूक कोंडी च्या समस्येवर काही प्रमाणात उपाय झाला असलातरी मात्र, दोन्ही बाजुकडील थांब्यावर उन्हापासून प्रवाशांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे या साठी प्रवासी शेड उभारणे आवश्यक आहे. या संदर्भात पिंगुर्ळी सरपंचांचे लक्ष वेधले असता या वरही लवकरच उपाय योजना केली जाईल तो पर्यंत बस थांब्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पिंगुळी सरपंच श्री.अजय आकेरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here