Kokan: पीक विमा नुकसान भरपाई दिरंगाईबद्दलचे २९ ऑगस्ट रोजीचे आंदोलन तात्पुरते स्थगित

0
69
पीक विमा नुकसान भरपाई दिरंगाई
पीक विमा नुकसान भरपाई दिरंगाईबद्दलचे २९ ऑगस्ट रोजीचे आंदोलन तात्पुरते स्थगित

प्रतिनिधी – पांडुशेठ साटम

पीक विमा नुकसान भरपाई दिरंगाईबद्दलचे २९ ऑगस्ट रोजीचे आंदोलन तात्पुरते गणेशचतुर्थी संपेर्यंत स्थगित केले असल्याचे सांगण्यात आले असून याबाबतची नोंद शेतकऱ्यांनी घावी असे आवाहन करण्यात आले आहे.

आंबा काजू फळपीक विमा योजना नुकसान भरपाई १ जुलैला मिळणे आवश्यक होतं. या संदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक यांची वेळोवेळी भेट घेतली होती. २८ ऑगस्ट पर्यंत हि भरपाई न मिळाल्यास २९ ऑगस्ट रोजी आमदार श्री वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. https://sindhudurgsamachar.in/kokan-चाकरमान्यांसाठी-आनंदाच/

जिल्हा कृषी अधीक्षक श्री राऊत यांनी दूरध्वनी वरून आणि लेखी पत्राद्वारे हे आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केली. त्याचबरोबर यासंदेर्भात पुणे कृषी आयुक्त कार्यालय आणि विमा कंपनी यांच्याबरीबर आमचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत असे आश्वासन दिले आणि आंदोलन तात्पुरते स्थगित करावे अशी विनंती केली.

श्री राऊत यांच्या विनंतीला मान देऊन २९ ऑगस्ट रोजी होणारे आंबा ,काजू फळपीक नुकसान भरपाई योजने च्या दिरंगाई संदर्भातील धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे आवाहन शेतकऱ्यांसाठी केले आहे. तरी शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी. तसेच हे आंदोलन गणेशउत्सवापर्यंत स्थगित करण्यात आले आहे याबाबतची नोंद शेतकऱ्यांनी घावी असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशउत्सवापर्यंत हि रक्कम न मिळाल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता हे आंदोलन परत छेडण्यात येईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here